Mumbai Ganpati Visarjan 
गणेशोत्सव 2025

Mumbai Ganpati Visarjan : गणपती विसर्जनासाठी मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

10 दिवस सेवा केल्यानंतर आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

मुंबईत गणेश विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त

बंदोबस्तात 25 हजार पोलीस कर्मचारी तैनात

मुंबईत 10 हजार पालिका कर्मचारी देखील तैनात

(Ganpati Visarjan) 10 दिवस सेवा केल्यानंतर आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे.

हा दिवस लहान मुलांसोबत मोठ्यांसाठी देखील भावूक करणारा असतो. बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या नाम घोषात बाप्पाला आज निरोप दिला जाईल. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.

मुंबईतील चौपाट्यांवर पालिकेसह पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. आज ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरभरात तब्बल 25 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईत 10 हजार पालिका कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Hyderabad Tallest Ganpati Visarjan : हैदराबादमध्ये 69 फूट उंच मूर्ती! भारतातील सर्वात उंच बाप्पाला भावनिक निरोप देत विसर्जन पार; पाहा Viral Video

Pitru Paksha : ७ सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात! 'या' गोष्टी चूकुनही करु नका

Bhausaheb Rangari Ganpati Visarjan : पुण्यात भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक; वैशिष्ट्ये काय?

India squad VS Aus : श्रेयस अय्यरकडे भारत-A संघाची धुरा; ऑस्ट्रेलिया-A विरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर